आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलग सुट्यांचा लाभ:तीन दिवसांत महाबळेश्वरला 25 हजार पर्यटक; महाबळेश्वर, पांचगणी या पर्यटनस्थळी मोठी गर्दी

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलग सुट्यांमुळे महाबळेश्वर, पांचगणी या पर्यटनस्थळी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. एकीकडे ऐन उन्हाळ्यात पाऊस, धुके, थंडी, ऊन, ढगाळ वातावरण असे वेगळे पण आल्हाददायक वातावरण पर्यटक अनुभवत आहेत. या थंड हवेच्या ठिकाणी शुक्रवारी दुपारनंतर पर्यटकांची गर्दी वाढू लागली.

शनिवारी, रविवारी सकाळपासून २५ हजार पर्यटकांनी महाबळेश्वर, पांचगणी फुलून गेले होते. मागील दोन-तीन महिन्यांच्या परीक्षा काळानंतर पहिल्यांदाच पर्यटक या गिरीस्थळी येत असल्यामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक पर्यटकांचे स्वागत करत आहेत. महाबळेश्वर पर्यटन स्थळाचे मुख्य आकर्षण असलेल्या वेण्णालेक येथे नौकाविहारासाठी मोठी गर्दी हाेत आहे. चौपाटीवर मका कणीस, मका फ्रँकी अशा पदार्थांवर ताव मारण्यासह आलेदार चहा, भेळ, पाणीपुरी व आईसगोला, स्ट्रॉबेरी विथ क्रीमसारख्या पदार्थांची चव चाखताना दिसत आहेत.