आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:महालक्ष्मी मुखदर्शनाने होणार नववर्षाची सुरुवात, मंदिर व परिसरातील सर्व दुकाने खुली होणार

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मार्च महिन्यापासून बंद असलेले महालक्ष्मीचे सर्व दरवाजे खुले केले जाणार आहेत. मुखदर्शन, मंदिर परिसरातील दुकानेही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी पहाटे ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत दरवाजे खुले करण्यात आले आहेत. महालक्ष्मी मंदिरासह श्रीक्षेत्र जोतिबा आणि देवस्थान समितीच्या अखत्यारीतील सर्व मंदिरे दर्शनासाठी खुली राहणार आहेत.

श्री करवीरनिवासिनी महालक्ष्मी मंदिराचे चारही दरवाजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्णयाने १८ मार्चपासून दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर शासनाच्या निर्णयाने १६ नोव्हेंबरपासून एक दरवाजे खुले करून भाविकांसाठी दर्शनाची वेळ ठरवण्यात आली होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तशी दर्शनाची वेळही वाढण्यात आली. दरम्यान, या निर्णयाचे भाविकांसह व्यापाऱ्यांनीही स्वागत केले असून आता आम्हाला व्यवसाय करण्यास संधी मिळेल, असेही अनेकांनी सांगितले आहे. तसेच भाविकांनी एकदम गर्दी करू नये, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.

ख्रिसमस सुटीमुळे भाविकांची गर्दी
मंदिर खुले झाल्यापासून महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. वेळेच्या मर्यादेमुळे अनेक भाविकांना दर्शन मिळणे कठीण होते. तरीही रोज पंधरा हजार भाविकांना दर्शन मिळत होते. आता वेळ वाढवल्याने भाविकांची सोय होणार आहे. भाविकांनी सद्य:स्थितीत दर्शनाव्यतिरिक्त इतर बाबींसाठी मंदिर आवारात थांबू नये. तसेच परिसरातील दुकानदारांकडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास देवस्थान समितीमार्फत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे निश्चित करण्यात आल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...