आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:नव्या वर्षारंंभाची सुरुवात होणार महालक्ष्मी; 1 जानेवारी पासून मंदिराचे महाद्वार खुले होणार

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • पहाटे 6 ते रात्री 8 पर्यंत दर्शन सुरू राहणार

नव्या वर्षारंंभाची सुरुवात आशादायी निर्णयाने करुन महालक्ष्मी भक्तांना नववर्षाची सुखद भेट दिली आहे. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी मार्च महिन्यापासून बंद असलेले मंदिराचे महाद्वार खुले होणार आहे. येथून भाविकांसाठी मुखदर्शन सुविधा सुरू होणार, मंदिर परिसरातील दुकानेही सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

भाविक पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शनासाठी पहाटे सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत मंदिर दर्शन सुरू राहणार आहे. महालक्ष्मी मंदिरासह श्री क्षेत्र जोतिबा आणि देवस्थान समितीच्या अख्त्यारीतील सर्व मंदिरे या वेळेत दर्शनासाठी खुली राहणार आहेत. श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिराचा पूर्व दरवाजा खुला करण्यात आला होता आता महाद्वारही खुले होणार आहे. मंदिराचे सर्व दरवाजे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या निर्णयाने दि.१८ मार्च पासुन दर्शनासाठी बंद करणेत आले होते. त्यानंतर शासनाच्या निर्णयाने दि.१६ नोव्हेंबर पासुन एक दरवाजा खुला करुन भाविकांसाठी दर्शनाची वेळ ठरवीणेत आली होती. जस-जसा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला तसतशी भवीकांसाठी दर्शनासाठीची असलेली वेळ वाढविणेत आली होती.

ख्रिसमस सुट्टीमुळे भाविकांची गर्दी...

मंदिर खुले झाल्यापासून महालक्ष्मी दर्शनासाठी भाविकांची गर्दी होऊ लागली आहे. वेळेच्या मर्यादेमुळे अनेक भाविकांना दर्शन मिळवणे कठीण होते. तरीही रोज पंधरा हजार भाविकांना दर्शन मिळत होते. आता वेळ वाढविल्याने पर्यटक भाविकांची सोय होणार आहे. मुखदर्शन सुविधा सुरू झाल्याने स्थानिक भक्तांना दिलासा मिळणार आहे.

भविकांनी सद्यस्थितीत दर्शना व्यतिरिक्त इतर बाबीकरिता मंदिर आवारात थांबू नये. तसेच परिसरातील दुकानदारांच्या कडून कोणत्याही नियमांचे उल्लंघन झाल्यास देवस्थान समितीमार्फत त्यांच्यावर कडक कारवाई करणेत येईल असे निश्र्चित करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...