आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांची सरकारकडे मागणी:मदतीला उशीर होतोय, पॅकेज म्हणा की आणखी काही, पण लोकांना मदत जाहीर करा; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सुद्धा गरज आहे - देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते परिस्थितीची आढावा घेत होते. या दौऱ्यानंतर फडणवीसांनी कोल्हापूरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी 'अजूनही मदत आलेली नाही. अनेक घरात चिखल आहे. घरात साधे मीठ सुद्धा नसते. त्यामुळे आज तातडीची मदत ही महत्वाची असते. मदतीला उशीर होतो आहे. सरकारने तातडीने मदत करावी' अशी मागणी केली आहे.

शेती आणि पिकांचे नुकसान मोठे
पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील 22 ठिकाणी भेटी दिल्या आहेत. तेथील नागरिकांशी मी संवाद साधला. शेती आणि पिकांचे नुकसान मोठे आहे.कोल्हापूरचा बास्केट ब्रिजच्या बाबतीत दिरंगाई होते आहे. हे काम लवकर झाल्यास दळणवळणाचा प्रश्न राहणार नाही. 22 पुलांचा एक आराखडा सुद्धा तयार केला होता, त्याची अंमलबजावणी व्हावी असेही फडणवीस म्हणाले आहेत.

दीर्घकालीन उपाययोजनेची गरज
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, दीर्घकालीन उपाययोजना करण्याची सुद्धा गरज आहे. कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेवर आम्ही काम केले. जागतिक बँकेने त्यासाठी कर्ज मंजूर केले. यातून दुष्काळी भागाचा प्रश्न मिटेल, पुराचेही प्रश्न मिटतील. यासाठी एका बैठकीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती फडणीसांनी दिली.

पॅकेज म्हणा की आणखी काही
मुख्यमंत्री ठाकरे आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस हे दोघेही आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांची भेट झाली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत 'मी पॅकेज जाहीर करणारा मुख्यमंत्री नाही तर मदत जाहीर करणारा मुख्यमंत्री आहे असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावला होता. आता याला देवेंद्र फडणीसांनी प्रत्युत्तर दिले आहे. पॅकेज म्हणा की आणखी काही. पण लोकांना मदत जाहीर करा. सविस्तर निवेदन देणार आणि मुख्यमंत्री बोलवतील, तेव्हा बैठकीला जाऊ असे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...