आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटलांचा पराभव:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना शिवसेनेकडून त्यांच्या मूळ गावात धक्का, नऊपैकी सहा जागांवर विजय

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'एक खानापूर म्हणजे चंद्रकांत पाटील नाही'

राज्यभरात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. यात निवडणुकीत भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्याच मूळगावात मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपला शिवसेनेने जोरदार धक्का देत 9 पैकी 6 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या गावातील खानापूर ग्रामपंचायत गमवावी आहे. दरम्यान, एक खानापूर गाव म्हणजे चंद्रकांत पाटील नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे. प्रसार माध्यमांशी बातचीतमध्ये पाटील म्हणाले की, खानापूरमध्ये 6 पैकी 3 जागा आम्ही जिंकल्या आहेत. दोन जागांवर कमी मताने आम्ही पराभूत झालो आहे. पण तरीही गावाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे, असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...