आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापुरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत, त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल असा इशारा कर्नाटक सरकारला संभाजीराजे छत्रपती यांनी आज दिला.
महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले
बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. यावरुन जनसामान्यांतही संताप आहे. या बाबत अनेक प्रतिक्रीया उमटत असून संभाजीराजे छत्रपतींनी आपली प्रतिक्रिया देत या घटनेचा निषेध केला.
संभाजीराजेंचे ट्विट
सीमावादानंतर टीका-टिप्पणी
शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सीमावाद आणि वाहनांवरील हल्ल्यांवर प्रतिक्रिया देत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. महाराष्ट्र पेटला तर सरकारला भारी पडेल, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.
राज्य सरकारने डोळे मिटले
राऊत म्हणाले की, स्वाभिमान, अस्मिता, महाराष्ट्राचा अभिमान, आपल्या लोकांविषयी प्रेम आहे की नाही. पुण्यात शिवसैनिकांनी आंदोलन केले. लढवय्या शिवसैनिकांना शिंदे-फडणवीस सरकार पोलिस लाठ्या काठ्यांनी मारहाण करीत आहेत. कोल्हापुरातही तेच सुरु आहे. तुम्ही कुणाचे काम करीत आहात.
सीएम शिंदेंवर टीकास्त्र
राऊत म्हणाले, सीमावाद चालु असताना मुख्यमंत्री कुठे आहेत? के सांगतात की, आम्ही बेळगावात जाऊन लाठ्या-काठ्या खाल्या. जर तुम्ही सीमाप्रश्नासाठी लाठ्या खाल्या तर आज ज्या खुर्चीवर बसला आहात, त्या खुर्चीवरून महाराष्ट्राचा कर्नाटकने केलेला अपमान तुम्ही पाहिला नसता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.