आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात थेट रद्द केल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी मराठा समाजाकडून रस्त्यावर उतरून आंदोलने करण्यात येत आहेत. आज कोल्हापूरातही बैठका, आंदोलनाला सुरुवात झाली.
मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा मोर्चा समन्वयकांची कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू महाराजांसोबत बैठक पार पडली. बैठकीत मराठा आरक्षणासाठी लढ्यासाठी पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षणासाठी राज्याचे केंद्रस्थान कोल्हापूर व्हावे ही सकल मराठा समाजाची भूमिका आहे. शाहू महाराजांनी नेतृत्व करावे असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या विषयावर झाली चर्चा...
सकल मराठा समाज आचारसंहिता बनवणार , आरक्षण मिळविण्यासाठी आता लोकप्रतिनिधीनी केंद्र सरकार सोबत चर्चा करावी अशी भूमिका, राजकीय व्यक्तीने कार्यकर्ता म्हणून सहभागी व्हावे, नेतृत्व सकल मराठा समाजाकडे राहील, कोणत्याही मराठा व्यक्तीने आत्महत्येचा मार्ग निवडण्यापासून दूर राहावे, राज्यभर एकच भूमिका राहावी
राज्य शासनाकडे समाजाच्या मागण्या....
१. त्रुटी दूर करून घटनात्मक टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी पुन्हा प्रक्रिया सुरू करावी.
२. सारथी संस्थेचा विस्तार करावा, प्रतिवर्षी 2000 कोटी द्यावेत. सक्षम अधिकारी नेमावेत
३. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची मर्यादा वाढवावी, जाचक अटी दूर कराव्यात. ५ हजार कोटी तरतूद करावी.
४. मराठा समाजातील विद्यार्थी फी ओबीसी समाज प्रमाणे आकारावी
५. स्पर्धा परीक्षेतून भरती उमेदवारांना पदे द्यावीत
आत्मक्लेश आंदोलन सुरू
राजश्री शाहू छत्रपती समाधी स्मारक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने प्रमुख कार्यकर्ते मराठा आरक्षणाच्या अन्यायकारक निर्णयामुळे राजश्री शाहू छत्रपती महाराज पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला खंत व्यक्त करत आत्मक्लेश सुरू केले.
सकल मराठा शौर्यपीठाचा आंदोलनाचा इशारा : सुपर न्युमररी पद्धत असू दे किंवा पुनर्विचार याचिकेद्वारे आरक्षण मिळावे ही मागणी
आज खरं म्हणजे मराठा समाज आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक काळा दिवस आहे मराठा समाजाचं आरक्षण सुप्रीम कोर्टानं रद्द केलेले आहे आणि त्यावर मराठा समाजातून अतिशय संतापजनक अशा प्रतिक्रिया उमटत आहेत आज मराठा आंदोलक म्हणून अतिशय तीव्र अशा भावना याप्रसंगी आम्ही व्यक्त करत आहोत आणि प्रशासना कोरोना च्या पार्श्वभूमीवर आवाहन केले त्यानुसार आज जरी आम्ही शांत बसून आंदोलन करत असलो तरी सुद्धा येत्या काळात जर का राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांनी सुद्धा या भूमिकेवर समन्वयाने एकत्रित काम करण्याची गरज आहे अस आमचे मत आहे आणि या विषयावर राजकारण विरहित चर्चा होण्याची गरज आहे आणि सध्या मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या कडून मात्र एकमेकांवर दोषारोपाचा खेळ सुरू आहे असा मला वाटतंय तर ताबडतोब दोन दिवसात सुपर न्युमररी पद्धत असू दे किंवा पुनर्विचार याचिका द्वारा असुदे जर का मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी योग्य भूमिका जर का या सरकारने घेतली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा या प्रसंगी सकल मराठा शौर्यपीठ कोल्हापूरच्या वतीने आम्ही येथे देत आहोत तसेच कायदा व सुव्यवस्थेचा जर काय काही प्रश्न निर्माण झाला तर त्याला आम्ही जबाबदार असणार नाही असा सुद्धा इशारा शौर्यपिठाच्या वतीने आम्ही प्रशासनाला येथे देत आहोत आजच्या या आंदोलन प्रसंगी शौर्य पीठाचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद जाधव श्री प्रकाश सरनाईक श्री महादेव आयरेकर श्री मनोहर सौरप श्री विक्रम बाबा पवार श्री राजेन्द्र थोरावडे श्री नंदकुमार घोरपडे आदी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.