आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापुरात मराठा आंदोलन:आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन; पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन - खासदार धैर्यशील माने

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो- सतेज पाटील

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर, आता मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात आज म्हणजेच 16 जूनपासून कोल्हापुरात मराठा मूक मोर्चाला सुरुवात होत आहे. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळाच्या ठिकाणी पहिले आंदोलन होत आहे. दरम्यान, कोल्हापुरात आज जोरदार पाऊस कोसळत आहे. पण, भर पावसात हा मराठा मोर्चा निघत आहे. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

यावेळी बोलताना खासदार धैर्यशील माने म्हणाले की, महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी कोल्हापूरने एक पाऊल पुढे घेतले आहे. संभाजीराजेंनी सर्वांना हाक दिली, प्रकाशजी आंबेडकर सुद्धा कोल्हापूमध्ये आले, हे पाऊल निश्चित पणे यशस्वी होईल. आरक्षण कोणामुळे थांबले, आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही हा समाजाला प्रश्न. महाराष्ट्रातील सर्व 48 खासदारांनी आणि सर्व आमदारांनी एकत्र यावे आणि केंद्राला विशेष अधिवेशन घेण्यासाठी भाग पाडावे. मराठा आरक्षणासाठी मी लोकसभेत आवाज उठवेन, पंतप्रधान, राष्ट्रपतींनाही भेटेन, असे शिवसेना खासदार धैर्यशील माने म्हणाले.

संभाजीराजे, उद्याच मुंबईला या- सतेज पाटील
यावेळी बोलताना मंत्री सतेज पाटील म्हणाले की, राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करणे आमचे कर्तव्य आहे सुप्रीम कोर्टातील वकिलांची टीम आपण बदलेली नाही. केंद्र आणि राज्याच्या समनव्याची जबाबदारी संभाजीराजे तुमची आहे. राजेंनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन सकारात्मक आहे. मुख्यमंत्री आणि प्रमुख मंडळींना आपल्यासोबत बसून चर्चा करायचीये, उद्या तुम्ही मुंबईलाला यावे, उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेटतील. राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो. राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितलं.

बातम्या आणखी आहेत...