आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Kolhapur
  • Maratha Reservation In The Hands Of The Central Government, Prime Minister Narendra Modi Should Convene The Convention Of The Center; Rural Development Minister Hasan Mushrif

कोल्हापूर:मराठा आरक्षण केंद्र सरकारच्या हातात, पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केंद्राचे अधिवेशन घ्यावे; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू जयंतीच्या शुभेच्छा देत मराठा आरक्षणबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली.

समाजाच्या मागण्या 21 दिवसात पूर्ण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे. मात्र मराठा आरक्षण केंद्राच्या हातात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी केंद्राचे अधिवेशन घ्यावे. तसेच भाजपने मराठा समाजाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांनी हातात हात घालून मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे, असे मत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर येथे व्यक्त केले.कसबा बावडा येथील शाहू जन्म स्थळ येथे अभिवादन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील व खासदार संभाजी राजे छत्रपति यांची उपस्थिती होती.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मूक आंदोलन सुरू केल्यानंतर विनाविलंब मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्याची पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. सारथीचे उपकेंद्र कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी होती. ही मागणी मान्य झाल्याने आम्हाला आनंद होत आहे.

केंद्राने पावले उचलावीत...
यावेळी बोलताना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शाहू जयंतीच्या शुभेच्छा देत मराठा आरक्षणबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणात चा चेंडू आता केंद्राच्या हातात आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहे त्या मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता मराठा आरक्षणाबाबत केंद्राने पावले उचलावीत, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...