आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा बांधव एकजूट:आता मूक नव्हे ठोक मोर्चा काढू, कोल्हापुरातील ताराराणी चौकात चक्का जाम आंदोलन

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंदोलनस्थळी अवतरले जिजाऊ आणि शिवराय...

आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यापुढे अारक्षणाच्या मागणीसाठी मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा समाजाने दिला. हातात भगवे ध्वज, मागण्यांचे फलक आणि डोक्यावर भगवी टोपी घालून या आंदोलनात समाज बांधव सहभागी झाले. त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले. रास्ता रोको करत सरकारविरुद्ध आक्रोश व्यक्त केला. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या सरकारचे करायचं काय, खाली डोकं वर पाय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

पोलिस प्रशासनाने ‘रास्ता रोको’ आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता सकल मराठा समाज बांधव ताराराणी चौकात जमा झाले. ताराराणींच्या पुतळ्याभोवती उभे राहून घोषणाबाजीस सुरुवात करण्यात अाली. सर्व आजी-माजी आमदार व खासदारांनी रस्त्यावर उतरलेच पाहिजे, मराठाद्वेषी मागासवर्गीय आयोग रद्द करा, सारथी संस्थेला एक हजार कोटी मिळालेच पाहिजे, एमपीएससीची २०१४ पासून रखडलेली सर्व नियुक्तीपत्रे त्वरित देण्यात यावीत, पंजाबराव देशमुख मराठा हॉस्टेल प्रत्येक तालुक्यात झाले पाहिजे, नतद्रष्ट समाजकंटकांचा धिक्कार असो, या आशयाचे फलक त्यांच्या हातात होते.

आंदोलनस्थळी अवतरले जिजाऊ आणि शिवराय... आंदोलनात रिधिमा इंदूलकरने बालशिवाजी तर याज्ञी भोसले बालजिजाऊंच्या वेशभूषेत मोर्चात सहभागी झाली होती. त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शाहीर मिलिंद सावंत यांनी भगव्या सायकलसह सहभाग घेत पोवाडा सादर करत वातावरणात रंग भरला. कोल्हापूर येथील महाराणी ताराराणी चौकात मराठा समाजाने मोर्चा काढला.

बातम्या आणखी आहेत...