आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राजें'चा महाराष्ट्र दौरा:मराठा आरक्षणाविषयी मते जाणून घेण्यासाठी संभाजीराजेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा सुरू, 27 मे रोजी मांडणार ठोस भूमिका

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाची आरक्षणासंदर्भात मते जाणून घेऊन ती राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी खासदार संभाजीराजे यांनी राज्य दौरा सुरू केला आहे. आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्मारकाचे दर्शन घेऊन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महाराष्ट्र राज्याचा दौरा प्रारंभ केला. यावेळी वेगवेगळ्या समाजातील पदाधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद आणि त्यानंतर नांदेड असा त्यांचा आजचा दौरा असणार आहे.

सर्वच आंबेडकरवादी संघटनेसह बारा बलुतेदार यांनीही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला आहे. संभाजीराजे महाराष्ट्र दौऱ्यात मराठा समाजातील कार्यकर्त्यांना आणि तज्ञांना भेटणार असून त्यांची चर्चा करून पुढील दिशा ठरवणार आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर, तज्ञ यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न ते करणार आहेत. कोल्हापुरातील इतर समाजातील प्रतिनिधींनी देखील या प्रसंगी उपस्थित राहून मराठा समाजाला जाहीर पाठिंबा दिला. या सर्वांचा मराठा समाजाच्या वतीने मी अत्यंत ऋणी आहे असेही ते म्हणाले.

27 मे रोजी मांडणार भूमिका
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी देखील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर नाराजी व्यक्त केली होती. आरक्षण रद्द झाला त्या दिवशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले होते. कोरोनामुळे माणसं दगावत आहे, माणूस जगणे सध्या महत्वाचे आहे असे ते म्हणाले होते. समाजाला आरक्षण मिळण्यासाठी काय करता येईल यासाठी सर्वांचे मत घेऊन 27 मे रोजी ते आपली सविस्तर भूमिका जाहीर करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...