आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्ज जप्त:सांगली जिल्ह्यात पकडले 11 लाखांचे कोकेन; टांझानियाचा तस्कर अटकेत, मुंबईहून बंगळुरूला पोलिसांची कारवाई

सांगली2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यभरात ड्रग्ज प्रकरण तापले असतानाच सांगली जिल्ह्यातील वाघवाडी फाटा येथे एका खासगी बसमधून अकरा लाखांचे कोकेन विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या तरुणास सांगली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी जेरबंद केले. माकेटो जॉन झाकिया (२५, रा.जमोरिया मंगानो, टांझानिया) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे १० लाख ९० हजार रुपये किमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केले आहे. त्याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

माकेटो जॉन झाकिया याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने मंगळवार (३० नोव्हेंबर) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित माकेटो झाकिया हा रात्री खासगी ट्रॅव्हल्समधून कोकेन जवळ बाळगून प्रवास करत असल्याची माहिती तासगाव पोलिस ठाण्यातील सागर लवटे यांना खबऱ्याकडून मिळाली. माकेटो हा ट्रॅव्हल्समधून मुंबईतून बंगळुरूला निघाला होता. या वेळी सापळा रचून पोलिसांनी त्याला अटक करून ड्रग्ज जप्त केले.

बातम्या आणखी आहेत...