आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदी-अमित शहांचा जागा वाटपाचा निर्णय शिरसावंद्य:राजेश क्षीरसागर यांची शरणागतीची भाषा

सांगली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत केवळ ४८ जागा देण्याची घोषणा केल्यानंतर सत्ताधारी भाजप व शिवसेनेत ‘तू...तू...मैं...मैं...’ नाट्य रंगले होते. परंतु आज सांगलीत शिवसेनेचे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शहा राज्याच्या निवडणुकीत शिवसेनेला किती जागा द्यायच्या याचा निर्णय घ्यावा, आम्ही तो शिरसावंद्य मानू, अशी शरणागतीची भाषा व्यक्त केली. महाराष्ट्रातील विद्यमान सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असा विश्वास व्यक्त करून राज्यातील निवडणुका ज्या वेळी होतील, त्या वेळी सत्ताधारी युतीतील शिवसेनेच्या जागा ठरवण्याचा पूर्ण अधिकार हा मोदी व शहा यांनाच असेल. शिवसेनेला ज्या जागा मिळतील त्या आम्ही लढवू आणि महाशक्ती असलेल्या भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्वाने आम्हाला घवघवीत यश मिळेल, असेही ते म्हणाले.