आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर दौरा:उपमुख्यमंत्री अजित पवार आणि श्रीमंत शाहू छत्रपती यांच्यात न्यू पॅलेसमध्ये तासभर चर्चा

कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टाचा निकाल पुन्हा एकदा अभ्यासला पाहिजे-श्रीमंत शाहू छत्रपती

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले आहेत. आज(दि.14)त्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. त्यांच्यात तासभर चर्चा झाली.

या चर्चेनंतर श्रीमंत शाहू छत्रपतींनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वच मुद्द्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतःच माहिती देतील. मराठा समाजासाठी जे करता येईल,ते करण्याचे पवारांनी मान्य केल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. तसेच, सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावर दिलेला निकाल पुन्हा अभ्यासून पाहण्याची गरज असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी सकाळीच अजित पवारांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेज इथे भेट घेतली आहे. ही भेट पूर्वनियोजित नव्हती. आज सकाळी अजित पवार अचानकपणे शाहू छत्रपती यांच्या भेटीसाठी न्यू पॅलेस येथे दाखल झाले. 16 जूनला कोल्हापुरातून मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...