आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मोबाईल आणि गांजा प्रकरणावरून कोल्हापूरातील कळंबा कारागृह आधीच चर्चेत होते. येथील सुरक्षा व्यवस्थेवर अक्षेप घेऊन कारागृह अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तोवर आता कारागृहातील शिपायाच्या बुटांमध्ये अक्षेपार्ह चिठ्ठ्या आढळल्याने कारागृहात खळबळ माजली आहे. कारागृह कर्मचाऱ्यांची झडती घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बुटात अक्षेपार्ह चिठ्ठी ठेवणार्या पोलिस शिपायाचे नाव किसन आहे. पोलिसच कैद्यांना निरोपाच्या चिठ्ठ्या पाठवून मदत करत असल्याचे या घटनेमुळे समोर आले आहे.
गेल्या महिन्यात कारागृहात सापडलेल्या मोबाईलचा पुरावा नष्ट करण्याचा ठपका एका पोलीस शिपायावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर आता कारागृहातील आणखीन एका पोलिसाच्या सॉक्समध्ये कैद्याची चिट्ठी सापडणे म्हणजे गंभीर बाब आहे. पोलीस शिपाई किसन यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठीवर 'माझे महत्वाचे काम आहे, मला पंचवीस हजार रुपये लागणार आहेत आणि चिठ्ठी घेऊन येणाऱ्याला पंचवीस हजार रुपये द्यावेत' असा मजकूर लिहिला आहे.
किसनचा यापूर्वीच्या काही प्रकरणांमध्ये हात
कळंबा कारागृहात शिपायाच्या बुटाच्या बॉक्समध्ये कैद्यांना निरोपाची चिट्ठी सापडल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. संबंधित शिपाई किसनची आता चौकशी सुद्धा सुरू करण्यात आली आहे. स्वतः कारागृह अधीक्षक चंद्रमनी इंदुलकर यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. किसनचा यापूर्वी सुद्धा अशा घटनांमध्ये सहभाग असल्याचे सांगितले. संबंधित शिपायावर कडक कारवाई रण्यात येणार असल्याचे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुलकर यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.