आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्थसंकल्प 2022:अर्थसंकल्प नाही तर निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प'- गृहराज्यमंत्री  सतेज पाटील

प्रतिनिधी- कोल्हापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या. यावर विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी देखील या वर्षीचे बजेट म्हणजे येऊ घातलेल्या पाच राज्यातील निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर झालेला 'जुमलासंकल्प' असल्याची टीका केली आहे.

सतेज पाटील यांनी म्हटले आहे की, कधीच अंमलबजावणी न होणाऱ्या पोकळ घोषणा देण्याची गेल्या 7 वर्षांतील परंपरा यावर्षीही सुरू राहिली आहे. कोरोनाच्या संकटामुळे आर्थिक अडचणींमध्ये सापडलेल्या भारतातील मध्यमवर्गीय व पगारदार वर्गाचा भ्रमनिरास टॅक्स ब्राकेट न वाढवून या बजेटने केला असल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...