आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकिल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीला धक्काही लावलेला नाही. कबरीच्या मुळ ढाच्याला धक्का लागूही देणार नाही. केवळ कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात येत आहे, अशी स्पष्टोक्ती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
सुप्रीम कोर्टाचे आदेश
पत्रकार परिषदेत शंभूराज देसाई म्हणाले, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच जिल्हा प्रशासनाकडून आजची कारवाई करण्यात येत आहे. कबरीच्या मुळ ढाच्याला काहीही करणार नाही. सुप्रीम कोर्टानेच कबरीजवळ जे अनधिकृत बांधकाम दिवसेंदिवस वाढत आहे, ते हटवावे, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार केवळ कबरीजवळील बांधकाम हटवण्यात येत आहे.
मुळ ढाचा सुरक्षित
शंभूराज देसाई म्हणाले, अफजल खानाच्या कबरीच्या चारही बाजूंनी भितींचे बांधकाम आहे व त्यावर छत आहे. या मुळ बांधकामावर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही. हे बांधकाम सुरक्षित ठेवण्यात येईल. मात्र, याच्या बाजुलाच वाढीव, अनधिकृत बांधकाम करम्यात आले आहे. हे बांधकाम तातडीने हटवावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. या आदेशाची अंमलबजावणी सुरू आहे.
संजय राऊतांवर टीका
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या सुटकेवरही शंभुराज देसाई यांनी भाष्य केले. देसाई म्हणाले, ईडीने जी काही कारवाई केली. त्यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. त्यावर आम्ही भाष्य करणे योग्य होणार नाही. याबाबत ईडी वरिष्ठ न्यायालयात योग्य ती बाजू मांडेल.
शिवसेना आमची
राऊतांवर टीका करताना देसाई म्हणाले, शिवसेना एकच आहे, असे संजय राऊतांचे म्हणणे आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही व फोडलेलीही नाही. 100 दिवस तुरुंगात असल्यामुळे आमच्या पक्षाचे नाव बाळासाहेबांची शिवसेना आहे, हे कदाचित राऊतांना माहित नसेल. केवळ लक्ष वेधण्यासाठी ते अशा प्रकारची वक्तव्य करत असतात.
ठाकरेंनी विचार करावा
शंभूराज देसाई म्हणाले, संजय राऊत या एकाच व्यक्तीमुळे 40 आमदार व 12 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यामुळे आता संजय राऊतांना किती महत्त्व द्यायचे, याचा विचार उद्धव ठाकरेंनीच करावा. आम्ही आमच्या भूमिकेवर अजूनही ठाम आहोत. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे जात आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.