आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिवेंद्रसिंहराजेंनीही राज्यपालांना सुनावले:पदावरील व्यक्तीने जबाबदारीने बोलावे, समाजात वाद निर्माण करू नये

सातारा / प्रतिनीधी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल पदावर असलेल्या व्यक्तीने लोकांच्या भावना भडकतील, असे वक्तव्य करू नये. त्यांनी जबाबदारीचे भान ठेवावे, अशी प्रतिक्रिया सातारच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज व सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.

वक्तव्यांमुळे समाजात वाद

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दोन दिवसापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी वादग्रस्त विधान केले होते. यावर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपण बोलल्यामुळे समाजात वाद निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य कोणीही करू नये, असे आवाहन केले.

सामान्यांच्या भावना दुखावतात

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य केल्याने जनसामान्यांच्या भावना दुखावतात. त्यामुळे अशी वक्तव्ये टाळावीत. यामुळे समाजामध्ये वाईट विचार पसरतात. अशा वक्तव्यांमुळे समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून चर्चेमध्ये आणण्याचे जे प्रकार सुरू आहेत, ते कुठेतरी आता थांबले पाहिजे. समाजामध्ये जबाबदार व्यक्तींनी भान ठेवून बोलले पाहिजे, आपण काय बोलतो, त्याचा जनतेला काय संदेश जातोय, याचा विचार करून बोलले पाहिजे . राज्यपालांच्या वक्त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांनीही संताप व्यक्त केला आहे. संभाजीराजे छत्रपती आणि उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

राज्यपाल सन्मानाचं पद:बोलण्यापूर्वी अक्कल पाहिजे; सुधांशू त्रिवेदी थर्ड क्लास भिकारडा, दिसेल तिथे चोपून काढा- उदयनराजे

संभाजीराजे छत्रपतींचा फडणवीसांना सवाल:राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींची पाठराखण का करताय?; दोघांना माफी मागायला लावा

बातम्या आणखी आहेत...