आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातारा:मोदींची बुलडोझर नीती देशाच्या एकात्मतेला घातक : वृंदा कारत

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ व इतर जीवनावश्यक सुविधांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाकडे लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक व्यवस्था उद्ध्वस्त करणारी बुलडोझर नीती देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला अतिशय धोकादायक आहे, अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्यूरो सदस्य व माजी खासदार वृंदा कारत यांनी साताऱ्यात केली.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेचे १२ वे राज्यस्तरीय अधिवेशन साताऱ्यात झाले. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कारत म्हणाल्या, गेल्या आठ वर्षांत भांडवलशाही अर्थव्यवस्था प्रबळ झाली असून देशातील ६१ टक्के जनतेचे मासिक उत्पन्न दहा हजार रुपयांच्या आतच राहिले आहे. तब्बल सहा कोटी तरुणांना रोजगार गमवावा लागला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यांची दरवाढही गगनाला पोहोचलेली आहे. तरीसुद्धा प्रत्येक प्रार्थना स्थळाच्या मागे शिव पिंड शोधण्याचा भाजपचा उद्योग म्हणजे देशामध्ये शांतता आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा घातक पायंडा निर्माण केला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...