आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी आणि श्री जोतिबा चरणी २०१९-२० च्या आर्थिक वर्षात सुद्धा भाविकांनी मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. अंबाबाई चरणी १९१ तोळे (७१लाखाचे) सोन्याचे दागिने तर जोतिबा चरणी २८ तोळे (१२ लाखांचे) दागिने भक्तांनी दान केले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत हे दान कमी असले तरी कोरोनासदृष्य परिस्थितीतही भाविकांकडून भक्तीचा ओघ सुरू राहीला.
करवीनिवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा या देवस्थानवर बारामाही भाविकांची गर्दी असते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून देवीला सोने-चांदीचे दागिने अर्पण होतात. या दोन्ही मंदिराला गेल्या आर्थिक वर्षात अर्पण झालेल्या सोने व चांदीच्या दागिन्यांचे मूल्यांकन पूर्ण झाले आहे.
एक एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीत करवीरनिवासिनी महालक्ष्मीला सोने व चांदीचे मिळून एकूण ७१ लाख ६९ हजार ६७४ रुपये किंमतीचे दागिने अर्पण झाले आहेत. जोतिबा मंदिराला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने व चांदीच्या दागिन्यांची एकूण किंमत १२ लाख पाच हजार ४२७ रुपये इतकी आहे. दोन्ही मंदिराला मिळून वर्षभरात ८३ लाख ७६ हजार ९९रुपयांच्या किंमतीचे दागिने अर्पण झाले आहेत.तर चांदीचा विचार केल्यास महालक्ष्मी चरणी १८ किलो चांदीचे दागिने तर जोतिबा चरणी जवळपास ८ किलो चांदीचे दागिने भक्तांनी अर्पण केले आहेत.
दागिन्यांच्या मूल्यांकनाचे काम मुंबई येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पुरुषोत्तम काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव व सचिव विजय पोवार यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. समितीच्या खजानिस वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, चारुदत्त देसाई, राजाराम गरुड यांच्या उपस्थितीमध्ये मूल्यांकनाची प्रक्रिया झाली. मंदिरातील गरुड मंडप येथे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.