आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातात मायलेकरांचा जागीच मृत्यू:दुचाकीवरून जाताना कारची धडक, लोणंद-फलटण रोडवरील घटना

सातारा / प्रतिनिधीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा जिल्ह्यातील लोणंद-फलटण रोडवर आदर्की जवळच दुचाकी अपघातात मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. लता नारायण चव्हाण (वय 60) व निखिल नारायण चव्हाण (वय 30) अशी त्यांची नावे आहेत.

दोघेही कापशी बिबीला जात होते. जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील ते रहिवासी आहेत. समोरून येणाऱ्या ओमनी कारला धडकून झालेल्या भीषण अपघातामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. वडाचे म्हसवे येथून दुचाकीवरून कापशी बिबीला लता नारायण चव्हाण हे आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी जात होत्या. लोणंद फलटण रोडवर समोरून येणाऱ्या ओमनी कारने दुचाकीला धडक दिली. यातच निखिल नारायण चव्हाण, लता नारायण चव्हाण हे दोघे जागीच झाले. या भीषण अपघातात मायलेकरांच्या अशा मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे

वडाचे म्हसवे गावावर शोककळा

माय लेकरांच्या झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे वडाचे म्हसवे गावावर शोककाळा पसरली आहे. निखिल नारायण चव्हाण हा युवक म्हसवे येथे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखला जात होता. या अपघाताची नोंद वाठार स्टेशन पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...