आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:सासरे पॉझिटीव्ह आल्याने शिवसेना खासदार धैर्यशील माने कुटुंबासह होम क्वारेंटाईन

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे प्रवक्ते व तरुण खासदार धैर्यशील माने यांच्या सासऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे खासदार माने कुटुंबियांसह १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन झाले आहेत. खासदार माने यांनीच सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे.

खासदार माने यांनी ट्वीट करुन माझे सासरे, त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसून आल्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. शनिवारी सायंकाळी ५.०० वाजता त्यांचा अहवाल आला असून ते कोरोना बाधित आहेत. त्यांच्याशी संपर्क आल्यामुळे खबरदारी म्हणून मी माझ्या कुटुंबियांसमवेत पुढील १४ दिवस क्वारेंटाईन होत आहे. गरजेच्या वेळी मी व माझे सहकारी आपल्या सेवेसाठी फोनवरून उपलब्ध आहोत. कोणतीही मदत लागल्यास नागरिकांनी फोनवरून संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. तसेच गेल्या चार दिवसांत जे सासऱ्यांच्या व माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी खबरदारी म्हणून लवकरात लवकर तपासणी करून घ्यावी असेही त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...