आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मराठा आरक्षण:विद्यमान सरकार असो कि मागचे सरकार, दगाफटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, खासदार संभाजीराजे यांचा इशारा

कोल्हापूर13 दिवसांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

विद्यमान सरकार असो कि मागचे सरकार...दगाफटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल. मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापुढे समाज जी दिशा ठरवेल तिच माझी भूमिका असेल असेही संभाजीराजे यांनी स्पष्ट केले आहे.

यावेळी संभाजीराजे म्हणाले की, 'आज मराठा समाजावर अन्याय झाला. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे.'

'मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल,' असेही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

0