आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:खासदार संजय मंडलिक कोरोना पाॅझिटीव्ह, पत्नी आणि मुलगाही संक्रमित

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांची कोव्हिड टेस्ट पाॅझिटिव्ह आली आहे. त्यांची पत्नी व मुलगाही पाॅझिटीव्ह आले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या २० हजारांपर्यंत पोहोचली आहे. दिवसात सरासरी ५०० ते ६०० रुग्ण आढळून येतात. यातून जिल्ह्यातील तीन आमदारांसह वरीष्ठ शासकीय अधिकारीही कोरोना बाधित झाले आहेत. इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे, कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव, दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल ही कोरोना बाधित झाले आहेत. कोव्हिड चाचणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी त्यांची प्रकृती ठिक आहे असेही कळविले आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी असे आवाहन खा. मंडलिक यांनी केले आहे.