आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदयनराजेंची हटके स्टाईल:कार्यकर्त्याला स्वत:च्या तोंडाने भरवला पेढा, उपस्थितांची टाळ्यांच्या कडकडात दाद

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्या करारी, रोखठोक आणि धारदार भूमिकेमुळं खासदार उदयनराजे भोसले यांची कायमच चर्चा होत असते. आता पुन्हा ते चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या चाहत्याला चक्क स्वत:च्या तोंडाने पेढा भरून शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांचा शुभेच्छा देण्याचा अंदाज पाहून कार्यकर्तेही भारावून गेले. आपल्या हटके स्टाईलने उदयनराजेंनी उपस्थितांची मने जिंकली. उदयनराजेंचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या खूप गाजतोय.

तर झाले असे की, विनोद मोरे या कार्यकर्त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले कार्यक्रमात पोहचले. यावेळी त्यांनी आपल्या हटके स्टाईलने विनोद यांना पेढा भरविला. राजेंनी स्वत:च्या तोंडाने पेढा भरवल्यानंतर विनोद मोरेंच्या चेहऱ्यांवर आनंद दिसून येत होता. तर उदयनराजेंच्या चेहऱ्यावरही हसू पाहायला मिळाले. यावेळी सर्व उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या कडकडात त्यांना दाद दिली.

उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलसाठी ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये प्रिय आहेत. यापूर्वी त्यांनी पुष्पा सिनेमाच्या गाण्यावर अनोख्या शैलीत कॉलर उडवत फ्लाईंग किस करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय, उदयनराजेंनी लॉकडाउनला विरोध करत साताऱ्यात भीक मांगो आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाची सर्वत्र चर्चा झाली होती.

सातारा वासियांच्या मनात उदयनराजे भोसले यांच्याविषयी एक वेगळा आदर आहे. शिवाजी महाराजांचे ते थेट 13 वे वंशज असल्याने सातारा आणि त्याच्या आसपास उदयनराजेंचा एक वेगळा दरारा आपल्याला सतत अनुभवायला मिळतो. उदयनराजे यांच्या मातोश्री राज्यमाता कल्पनाराजे भोसले, पत्नी दमयंतीराजे भोसले व मुलं नयनतारा राजे, विरप्रतापसिंह राजे आहेत.

बातम्या आणखी आहेत...