आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींविरोधात गुन्हा दाखल:प्रेमप्रकरणातून आईवडिलांनीच केला अल्पवयीन मुलीचा गळा दाबून खून

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अल्पवयीन मुलीचा आई-वडिलांनीच गळा दाबून खून केल्याची घटना येणके (ता. कराड) येथे घडली. याप्रकरणी कराड तालुका पोलिसांनी मुलीच्या आईवडिलांना अटक केली आहे. दरम्यान, ऑनर किलिंगचा प्रकार असल्याने पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. येणके (ता. कराड) येथील संजय नारायण गरुड (४५) यांनी २२ एप्रिल रोजी त्यांची मुलगी स्वप्नाली संजय गरुड (१७ वर्षे ११ महिने २० दिवस) ही शाळेत पुस्तके जमा करण्यासाठी गेली असता तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली.

मात्र तपास करत असताना मुलीच्या आईवडिलांच्या संशयास्पद वागणुकीमुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता आम्हीच मुलीचा खून केला असल्याबाबतची कबुली त्यांनी दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोपींनी मुलीला केवळ याच कारणामुळे मारले की आणखी काही कारण आहे, याबाबतही पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...