आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोखंडी खोऱ्याच्या तुंब्याने पत्नीच्‍या डोक्यात वार:चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

सांगलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी खोऱ्याच्या तुंब्याने डोक्यात पाच ते सहा वेळा वार करून खून केल्याची घटना विटा येथे उघडकीस आली.याप्रकरणी महिलेचा पती सिद्धाप्पा भीमाप्पा शिवगोंड याला अटक करण्यात आली आहे.

भाग्यश्री सिद्धाप्पा शिवगोंड (२५, रा.विटा) असे मृत विवाहितेचे नाव आहे. विट्यातील जुना वासुंबे रोड तलावाजवळ कर्नाटकातील सिद्धाप्पा शिवगोंड पत्नी भाग्यश्री व कुटुंबासह गेल्या सहा वर्षांपासून झोपडीमध्ये राहताे. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये वादावादी झाली. पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत पतीने डोक्यात घाव घालून तिचा खून केला.

बातम्या आणखी आहेत...