आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारदार शस्त्राने एकाचा खून:खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकला; एकाला अटक, इतर आरोपींचा शोध सुरू

सातारा15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फरासवाडी (ता. सातारा) येथे धारदार शस्त्राने एकाचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये फेकून देण्यात आल्याची घटना उघडकीस आली. फिरोज चांद मुलानी (३७, सध्या रा. फरासवाडी-कोंडवे, ता. सातारा, मूळ रा. कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच खून केल्याचे समोर अाले, असून त्याला अटक करण्यात आली आहे. फिरोज कुटुंबासह सासुरवाडीत राहतो. मंगळवारी रात्री त्याच्या भावाला फिरोजचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सातारा तालुका पोलिसांना घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल रुग्णालयामध्ये नेण्यात आला. पोलिसांनी संशयित आरोपीचा शोध सुरू केला आहे. काही जणांची चौकशी सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...