आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपोत्सवाचा सोहळा:पंचगंगेकाठी अवतरले नक्षत्र....

कोल्हापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवारी पहाटे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापूर शहरातील पंचगंगा घाटावर दीपोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात झाला. पंचगंगा नदीघाट परिसरात दिवे लावून घाट उजळण्याची परंपरा जुनी आहे. मात्र गेल्या दहा वर्षांत या दीपोत्सवाला लोकोत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पंचगंगा घाटावर अनेक स्थानिक हौशी कलाकार आपले कलागुण दाखवत असतात.

रांगोळीतून सामाजिक संदेश पंचगंगा घाटावरील या दीपोत्सवाच्या निमित्ताने जणू सुंदर रांगोळ्यांचे प्रदर्शनच भरत असते. विविध लोककला, परंपरा, सामाजिक प्रश्न आणि कोल्हापूरची खासियत अशा विषयांवर यंदा रांगोळ्या बघायला मिळाल्या. मराठी अस्मिता, लव्ह जिहाद, वारकरी परंपरा, भृणहत्या आणि फुटबॉल प्रेमही व्यक्त झाले

बातम्या आणखी आहेत...