आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'मविआ'त एकी:फडणवीस सरकारने मराठा, धनगर समाजाची घोर फसवणूक केली; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

साताराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने निवडणूक प्रचारात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. मात्र, सत्तेत येताच त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लटकत ठेवून या समाजाची घोर फसवणूक केली, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथे केला.

पटोले यांनी म्हसवडला भेट दिली त्यानंतर येथील जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार ही अपात्र ठरतील असा विश्वास राष्ट्रीय कॉंग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नानासाहेब पटोले यांनी व्यक्त केला.

आमदार गोरेंना टोला

नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सरकार हे फसवणूक सरकार आहे. माण - खटाव तालुक्याने नेहमीच काँग्रेस पक्षाची पाठराखण केली. माण तालुक्यात याच महिन्यात मी दुसऱ्यांदा आलो आहे. या दुष्काळी माण तालुक्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरघोस निधी दिला होता. यामुळेच माण तालुक्यातील सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत, असे असतानाही येथील लोक प्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आहेत याचे सामान्य जनतेला काहीही देणे - घेणे नाही. ती काल ही कॉंग्रेस सोबत होती आज ही आहे अन् उद्याही राहतील, असा टोला आमदार पटोले यांनी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेता मारला.

जगतापांविरोधात उमेदवार

राज्यात महाविकास आघाडी मध्ये कोणताही बेबनाव नसल्याचे स्पष्ट करून पटोले म्हणाले की, आमची आघाडी ही भक्कम असून यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रीत लढून सध्याच्या राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचू. यावेळी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, आम्ही स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देवू नये असे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते तरी ही त्यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे, भविष्यात जर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली, तर त्यांच्याविरोधात आमचा काँग्रेसचा उमेदवार उभा करणार असल्याचे यांनी सांगितले. पत्रकार परिषतदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुका अध्यक्ष बाबासाहेब माने, डॉ. धवलसिंह मोहिते - पाटील, दाऊद मुल्ला, नीलेश काटे आदी उपस्थित होते.

संबंधित वृत्तः

नाना पटोले राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व; शिंदे गटाचे आमदार शहाजी बापूंची बोचरी टीका​​​​​​​

दिव्य मराठी विशेष मुलाखत:लोकसभा, विधानसभेत भाजपच्या जागा घटणार, म्हणून फोडाफोडीचा खेळ : नाना पटोले