आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PM मोदी यांनी राणे यांना घेतले फैलावर:'पीए'च्या उठाठेवीमुळे मंत्रिपद काढण्याचा इशारा; खासदार राऊतांकडून पोलखोल

सिंधुदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना खाते काढून घेण्याचा इशारा दिला होता, अशी माहिती मंगळवारी खासदार विनायक राऊत यांनी दिली. ते कणकवली येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासगी सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी राणे यांच्या पीएला फैलावर घेतले होते, असा दावा त्यांनी केला.

नेमके प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नारायण यांना फैलावर घेत त्यांचे मंत्रिपद काढून घेण्याची धमकी दिल्याचा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. राऊत म्हणाले की, राणेंच्या सचिवाने अनेकांना गंडा घातला आहे. हे कारनामे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर गेले. त्यामुळे त्यांनी राणेंना चांगले फैलावर घेत या सचिवाला काढून टाकण्याच्या सूचना दिल्या. अन्यथा तुमचे मंत्रिपद काढू, असा इशारा त्यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला.

प्रश्नच कळाला नाही

विनायक राऊत पुढे म्हणाले की, केरळच्या एका खासदाराने लोकसभेत इंग्रजीत विचारलेला एक प्रश्नही राणे यांना समजला नव्हता. त्यामुळे ते बुचकळ्यात पडले होते. राणेंनी कानाला हेडफोन लावलेला. त्याचे हिंदीत भाषांतरही झाले. त्यामुळे त्यांना हा प्रश्नच समजला नाही. त्यांनी त्यावेळी असेच थातूर-मातूर उत्तर देऊन प्रश्न निकाली काढला. तेव्हापासून ते सभागृहात गेलेच नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

मालवणीही येत नाही

राऊत पुढे म्हणाले की, त्यांना हिंदी सोडा धड मराठीच काय मालवणीही बोलता येत नाही. त्यांना फडणवीस या शब्दाचा स्पष्ट उच्चार करता येत नाही. त्यांच्या लोकसभेच्या कार्यकाळात ते एकदाही प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले नाहीत, असा दावा त्यांनी केला. शिवाय त्यांनी जिल्ह्यातल्या नागरिकांना 'एमएसएमई'चा फुल फॉर्म सांगावा तरी असा चिमटा काढला.

सत्तारांना आडवे केले

विनायक राऊत पुढे म्हणाले की, शिंदे गट आज ना उद्या भाजपमध्ये विसर्जित होईल. भाजपने सत्तारांना आडवे केले. उदय सामंत यांची डिग्री बोगस असल्याचे पुरावेही त्यांनीच मीडियाला दिले. आता सामंत यांनी ठाकरे गटाच्या कोणालाही त्रास दिला, तर त्यांचा डांबर आणि बांधकाम क्षेत्रातला घोटाळा बाहेर काढू, असा इशारा त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...