आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमित्त:प्रतापगडावरील तुळजाभवानी मंदिरात नवमीला नवचंडी यज्ञ, खा. उदयनराजे भोसले यांनी घेतले दर्शन

सातारा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारणी केलेल्या किल्ले प्रतापगड येथील श्री तुळजाभवानी मंदिरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातारा येथील राजघराण्यातील खा. उदयनराजे भोसले यांनी सकाळी पूजा व खंडेनवमी निमित्त नवचंडी यज्ञ केला. सातारच्या राजघराण्याच्या मार्गदर्शनाखाली नऊ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. येत्या काही दिवसांतच किल्ले प्रतापगडाचा विकास व सुशोभीकरण या अनुषंगाने मुख्यमंत्री व संबंधित मंत्र्यांबरोबर बैठक घेणार असल्याचे खा. उदयनराजे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...