आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुविधा:कोल्हापूर विमानतळावर आजपासून नाइट लँडिंग सेवा सुरू

कोल्हापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोल्हापूर विमानतळावर ४ नोव्हेंबरपासून नाइट लँडिंग सुविधा सुरू होणार आहे. त्यामुळे विमानतळ विकासाच्या प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पार होणार आहे. शुक्रवारपासून नाइट लँडिंग सुविधा कार्यरत करण्यासाठी पूर्ण तयारी झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर विमानतळ २४ तास सेवेत कार्यरत असेल. कोल्हापूर विमानतळाच्या वैभवात भर घालणाऱ्या टर्मिनल बिल्डिंगचेही काम वेगाने सुरू असून ३१ मार्च २०२३ पर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर, कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीचे विस्तारीकरण केले. विस्तारीकरणानंतर धावपट्टी १७८० मीटर झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...