आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभाजीराजे अवमान प्रकरण:तुळजापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर सायंकाळी तहसीलदार-धार्मिक व्यवस्थापकांना नोटीस

तुळजापूर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती संभाजीराजेंच्या अवमानप्रकरणी मंदिर संस्थानच्या व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे व धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे यांना जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे यांनी नोटीस काढली असून प्रशासकीय कारवाई का करण्यात येऊ नये, असा खुलासा मागवला आहे.

व्यवस्थापक तहसीलदार व धार्मिक व्यवस्थापक दोघांना निलंबित करण्याची मागणी करत गुरुवारी (दि. १२) तुळजापूर शहरात कडकडीत बंद पाळण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा नोटिसा काढत प्रशासनाने कारवाईचा फास आवळला आहे. संभाजीराजेंना सोमवारी (दि.९) तुळजाभवानी मातेचे दर्शन घेताना मंदिर संस्थानने देऊळ कवायत नियमाचा दाखला देत गर्भगृहात जाण्यापासून रोखले होते. या प्रकारानंतर छत्रपती संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त करत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्षांना फोन करून जाब विचारला होता.

बातम्या आणखी आहेत...