आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचारिकेनेच या बाळाला पळवले:सांगलीत परिचारिकेने 1 दिवसाचे बाळ चोरले

सांगली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तासगाव येथील खासगी रुग्णालयातून एक दिवसाचे बाळ चाेरून नेले. या घटनेमुळे रुग्णालयात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतर ६ तासांनी ते परत आणून टाकले. पाेलिस तपासात रुग्णालयातील परिचारिकेनेच या बाळाला पळवले होते, असे निष्पन्न झाले आहे. बाळ पुन्हा आपल्या कुशीत सुखरूपपणे आल्यानंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला. मूल होत नसल्याने परिचारिकेने बाळ चोरले होते, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

सांगलीतील डॉ. अंजली पाटील यांच्या प्रसूतिगृहात हर्षदा शरद भोसले (२३) या महिलेने शनिवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र रविवारी सकाळी आपले एक दिवसाचे बाळ बेपत्ता झाल्याने हर्षदा हादरून गेल्या. दिवसभर माने कुटुंबीयांतील सर्वजण अक्षरश: हंबरडा फोडत होते. याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत अवघ्या सहा तासांतच बाळ हर्षदा यांच्या हाती सुखरूपपणे सुपूर्द केले. त्यानंतर या कुटुंबाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या रुग्णालयात काम करणारी परिचारिका स्वाती छबू माने (२९, रा. मोहोळ, जि. सोलापूर) हिनेच मूल चोरल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून पोलिसांनी स्वाती हिला अटक केली आहे.

सीसीटीव्ही फुटेजद्वारे झाला उलगडा
रुग्णालयातूनच भरदिवसा एक दिवसाच्या बाळाचे अपहरण झाल्याच्या घटनेची पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी गंभीर दखल घेतली. पोलिसांनी रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एका परिचारिकेचा संशय आला. तपासात ती फरार असल्याचे लक्षात येताच पोलिस तिच्या मागावर विटा येथे पोहोचले. तेथून ती भवानीनगर स्टेशनवर जात असताना तिला बाळासह ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...