आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महिला ST कंडक्टरचे निधन:सुषमा नारकर यांची 22 वर्षे कराड आगारात सेवा, सिल्व्हर ओकवरील आंदोलनात झाली होती अटक

सातारा13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा विभागातील एसटी महामंडळाच्या पहिल्या महिला वाहक (कंडक्टर) सुषमा नारकर यांचे बुधवारी राहत्या घरी निधन झाले. कराड आगारात त्यांनी २२ वर्षे सेवा बजावली. ८ एप्रिल रोजी मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचार्‍यांनी आंदोलन केले होते. त्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात त्यांना अटक झाली होती. आठ दिवस त्या कोठडीत होत्या. जामिनावर बाहेर पडल्यानंतर त्या आजारी पडल्या. प्रकृती खालावल्याने बुधवारी त्यांचे निधन झाले. या घटनेमुळे कराड आगारातील कर्मचार्‍यांवर शोककळा पसरली आहे.

2000 साली सेवेत रुजू

येवती (ता. कराड) येथील सुषमा नारकर या २००० साली कराड आगारात वाहक म्हणून भरती झाल्या होत्या. त्यापुर्वी एसटी महामंडळात महिला कर्मचार्‍यांची भरती होत नव्हती. पहिल्या वाहकाचा मान मिळाल्यामुळे प्रवाशांना देखील त्यांच्याबद्दल कुतूहल वाटत होते. २२ वर्षे त्यांनी कराड आगारात महिला वाहक म्हणून सेवा बजावली.

अटकेनंतर तब्येत ढासळली

एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचार्‍यांनी मुंबईत आंदोलन केल. ८ एप्रिल रोजी संतप्त आंदोलक शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी धडकले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. त्यात सुषमा नारकरदेखील होत्या. न्यायालयाने गुन्ह्यातील संशयितांना आठ दिवस कोठडी दिली होती. त्यादरम्यान नारकर आजारी पडल्या. पुढे जामीनावर मुक्त होऊन त्या आपल्या घरी परतल्या. मात्र, आजारपणामुळे त्या सेवेत रूजू झाल्या नव्हत्या. अखेर बुधवारी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे एसटी कर्मचार्‍यांवर शोककळा पसरली.

बातम्या आणखी आहेत...