आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:रस्ता विचारण्याचा बहाणा करून महिलेचे मंगळसूत्र हिसकावून नेले

सांगली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

र्नाळ ते मौजे डिग्रज जाणाऱ्या मार्गावर शेताकडे निघालेल्या महिलेला रस्ता विचारण्याचा बहाणा करत चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना घडली. महिलेच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चाकूने तोडून घेत दोघांनी दुचाकीवरून पलायन केले. याप्रकरणी उज्ज्वला राजकुमार लांडे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उज्ज्वला लांडे एका शेतातून निर्गुडीचा पाला घेऊन सायंकाळी घरी जात असतानाच दोघा तरुणांनी त्यांना नांद्रे गावाकडे जाणारा रस्ता विचारला. या वेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणाने लांडे यांना धक्का देत खाली पाडत चाकूच्या धाकावर दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र तोडून पलायन केले.

बातम्या आणखी आहेत...