आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'त्या' क्षणाला 305 वर्षे पूर्ण:अन् आदिलशाही राज्यात लपविलेली करवीर निवासिनी अंबाबाईची मूर्ती छत्रपतींच्या पुढाकाराने पुन्हा मूळ मंदिरात स्थापन झाली

कोल्हापूर7 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • यानिमित्त मंदिर फुलांनी सजले, देवीची विशेष अलंकार पूजा

आदिलशही काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. युद्धप्रसंगी मंदिरांची नासधूस केली जायची. अशावेळी अंबाबाई देवीच्या मूर्तीस काही अपाय पोहोचू नये या हेतूने करवीरनिवासिनी अंबाबाईच्या पुजाऱ्यांनी देवीची मूळ मूर्ती मंदिरातून काढून नेऊन कपीलतीर्थाजवळ गुप्त जागी ठेवली होती.

पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले आणि अंबाबाई मूर्तीची मंदिरात पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली. २६ सप्टेंबर १७१५ हा तो दिवस ज्याला आज ३०५ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आज करवीर निवासिनी अंबाबाईचे मंदिर पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने आतून फुलांनी सजवले होते. देवीची विशेष अलंकार पूजा बांधण्यात आली होती.

करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे शंभर वर्षांपूर्वी टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र
करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे शंभर वर्षांपूर्वी टिपलेले ऐतिहासिक छायाचित्र

पातशाह्यांच्या काळात कोल्हापूर प्रांतावर आदिलशहाचा ताबा होता. या काळात सर्वत्र धामधूम माजलेली असायची. पुढील काळात कोल्हापूर प्रांत स्वराज्यात आला. छत्रपतींचे स्थिरस्थावर राज्य स्थापन झाले, तेव्हा वेदशास्त्रसंपन्न नरहरभट सावगावकर यांनी करवीर राज्याचे अधिपती श्रीमंत छत्रपती संभाजीराजे (दुसरे) यांची पन्हाळगडावर भेट घेऊन महाराजांस हा सर्व वृत्तांत सांगितला व आपणांस साक्षात्कार होऊन आई अंबाबाईने आपली मूर्ती मूळ ठिकाणी स्थापन करावी, असा दृष्टांत दिल्याचे महाराजांस सांगितले. यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी आपले समहाराजांच्या आज्ञेनुसार सेनापती घोरपडेंनी सन १७१५ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीर निवासिनीच्या मूर्तीची मूळ मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना केली. ती तारीख होती दिनांक २६ सप्टेंबर १७१५.

तोच हा आजचा ऐतिहासिक दिवस, जेव्हा एक शतकाहून अधिक काळ गुप्तपणे लपवून ठेवलेल्या अंबाबाईच्या मूर्तीची तिच्या मूळ मंदिरात पुनर्स्थापना झाली. छत्रपतींच्या स्थिर व सुरक्षित राजसत्तेचे ते प्रतीक होते. मूर्तीबद्दलची माहिती देऊन आपल्याकडून हे शुभकार्य घडवून घेतल्याबद्दल छत्रपती संभाजीराजांनी नरहरभट यांना काही पेठा व वतने इनाम दिली व देवीच्या नित्य पूजाअर्चेसाठी सावगाव हे गाव इनाम दिले. छ्त्रपती संभाजीराजे (दुसरे) म्हणजे छत्रपती शिवरायांचे नातू व छत्रपती राजाराम महाराजांचे सुपुत्र होत.

बातम्या आणखी आहेत...