आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:कागलमध्ये वर्चस्ववादातून सत्तुराचे 16 वार करुन एकाचा निर्घृण खून

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

कागलमध्ये भरवस्तीत एकाचा खून झाल्याची घटना घडली आहे. अक्षय विनायक सोनुले नावाच्या तरुणाचा महालक्ष्मी मंदिरासमोर दोघांनी सत्तुराचे 16 वार करुन खून केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय सोनुले या तरुणाचा पुर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातुन खून करण्यात आला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास अक्षय कागलमधील लक्ष्मी मंदिरासमोरुन आपल्या बुलेट गाडीवर जात असताना दोघांनी त्याच्यावर सत्तुराचे 16 वार केले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे करत आहेत.