आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारल्यानंतर किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधली. ती भावी पिढीला का बांधली हे कळायलाच हवे आणि त्याचा इतिहास पुढे आलाच पाहिजे म्हणून ती सर्वांना खुली करावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज व भाजपचे खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी आज सकाळी सातारा येथे माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केली. आताची आणि भावी पिढी आहे ज्यांना समजले पाहिजे की ही कबर येथे का आहे. याचा इतिहास सांगून खा. उदयनराजे म्हणाले की, अफजलखानाची कबर खुली करायला हवी. कारण त्याशिवाय इतिहास जिवंत राहणार कसा? अफजलखानाच्या कबरीपासून अतिक्रमण हटवलेच पाहिजे होते. त्यात गैर काहीच नाही. कोणत्याही समाजाला गैरसमज करून घेण्याची गरजच नाही असेही उदयनराजे भोसले या वेळी बोलताना म्हणाले. लंडन येथून जगदंब तलवार भारतात आणण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या घोषणेबद्दल ते म्हणाले की हा प्रयत्न स्तुत्य आहे आणि ती आणलीच पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.