आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयाचा निकाल:तब्बल तीस वर्षांपासून मोबदला न दिल्याने कलेक्टरची खुर्ची, संगणक, गाडी जप्तीचे आदेश

कोल्हापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकासासाठी भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला तीस वर्षांपासून दिला नसल्याने बुधवारी दिवाणी न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची, लॅपटॉप, गाडी आणि इतर साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले. सध्या कोल्हापुरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे काम पाहतात. आज १२ वाजता हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची आणि इतर साहित्य जप्त करण्यासाठी कार्यालयात दाखल झाले.

रस्त्यासाठी संपादित केलेला जमिनीचा मोबदला द्यायला विलंब केला म्हणून जयसिंगपूर दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. १९८५ मध्ये रस्त्यासाठी जमीन मालक वसंत संकपाळ यांची जमीन ताब्यात घेतली होती. दाव्याचा निकाल २७ जून २०१९ रोजी होऊन वादातील हा कुरुंदवाड नगर परिषदेकडील विकास आराखड्यापैकी असल्याचे ठरवण्यात आले होते. संकपाळ यांना तीन महिन्यांच्या आत द्यावी, असा आदेश जयसिंगपूर न्यायालयाने निकालात दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या कारवाईची चर्चा मोठ्या प्रमाणात काेल्हापुरा रंगली होती.

नऊ मार्चच्या आदेशाची बुधवारी केली अंमलबजावणी या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने वसंत संकपाळ यांनी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी याचिका दाखल केली होती. आदेशाची अंमलबजावणी जिल्हाधिकाऱ्यांनी न केल्याने संकपाळ ५ जानेवारी २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्तेची जप्ती करून त्यांना दिवाणी तुरुंगात ठेवण्याची मागणी केली होती. यानुसार दिवाणी न्यायाधीशांसमोर जयसिंगपूर न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायाधीशांनी ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश दिले.