आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:...अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करणार, खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्राद्वारे इशारा

कोल्हापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी केलेल्या मूक आंदोलनाची दखल घेऊन राज्य शासनाने १७ जून रोजी बैठक घेतली. या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य करण्यात आल्या. त्यांच्या पूर्ततेसाठी प्रशासनाने कालावधी मागितला होता. मात्र, एक महिना पूर्ण होऊनदेखील प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व उपसमितीच्या सदस्यांना पत्र लिहून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत त्वरित कार्यवाही करा, अन्यथा आम्ही पुन्हा लढा सुरू करू, असा इशारा दिला आहे.

मागच्या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा झाली. सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी मागितला होता. याबाबत राज्य शासनाचे वतीने करण्यात आलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. मात्र, अजूनही मागण्या पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...