आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोल्हापूर:खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे कोल्हापूरात संताप

कोल्हापूर2 वर्षांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अॅड. गुणवंत सदावर्ते यांच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. कोल्हापुरात अॅड सदावर्तेंचा निषेध नोंदवून ऐतिहासिक शिवाजी महाराज चौक व दसरा चौकात सदावर्तेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरच्या महापौर निलोफर आजरेकर यांचीही उपस्थिती होती.

संभाजीराजे छत्रपती यांच्या विरोधात अॅड सदावर्तेंनी अक्षेपार्ह विधान केल्याचे समजताच कोल्हापूरातील विविध जाती, धर्म व समाजाने एकत्र येऊन अॅड सदावर्तें यांच्याविषयी तीव्र संताप व्यक्त केला. सदावर्तेंच्या विरोधातील घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उत्तरेश्वर पेठेतील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सदावर्ते यांच्या प्रतिमेचे प्रतीकात्मक दहन करून निदर्शने केली.

मराठा महासंघ, सकल मराठा समाज, शौर्य पीठ, मावळा संघटना, ब्लॅक पॅंथर, मुस्लिम बोर्डिंगसह विविध मुस्लिम संघटनांनी दसरा चौकात निषेध नोंदवून जोरदार आंदोलन केले.

बातम्या आणखी आहेत...