आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:शौचालयाचे पाणी वापरत होता पाणीपुरीवाला, व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिकांनी दिला चोप

कोल्हापूर9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोल्हापुरातील रंकाळा तलाव्याजवळील घटना, पुन्हा गाडा न लावण्याची नागरिकांची ताकीद

कोल्हापूरात पाणीपुरी खाणाऱ्यांसाठी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक पाणीपुरीवाला पाणीपुरीसाठी शौचालयातील पाण्याचा वापर करून पाणीपुरीचा मसाला तयार करताना दिसत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर नाराज लोकांनी संध्याकाळी घटनास्थळी पोहचत पाणीपुरीवाल्याला कोल्हापुरी हिसका दाखवला.

परिसरात होता प्रसिद्ध

रंकाळा तलावाजवळील हा पाणीपुरीवाला परिसरात प्रसिद्ध होता. दररोज शेकडो लोक येथे पाणीपुरी खाण्यासाठी येथ होते. समोर आलेल्या व्हिडिओत तो व्यक्ती एका प्लॅस्टिक जारमध्ये शौचालयाबाहेरील नळातून पाणी भरताना दिसत आहे. तेच पाणी घेऊन तो ठेल्यावर जातो आणि पाणीपुरीच्या मसाल्यात मिसळतो.

नागरिकांनी दाखवला कोल्हापुरी हिसका

व्हिडिओ समोर येताच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्या व्यक्तीला कोल्हापूरी हिसका दाखवला. तसेच येथून पुढे तिथे ठेला न लावण्याची ताकीदही दिली. दरम्यान या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

पाणीपुरीवाल्याचे स्पष्टीकरण

आपल्या बचावात पाणीपुरीवाला म्हणाला की, त्याने हे पाणी केवळ लोकांना हात धुण्यासाठी ठेवले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांना गैरसमज झाला आणि त्यांनी मला मारहाण केली. तसेच काही लोकांनी मुद्दाम हा व्हिडिओ तयार केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केल्याचेही तो म्हणाला.

बातम्या आणखी आहेत...