आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हापूर:राजस्थानसह तीन राज्यात मोस्ट वाॅंटेड असलेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जर याला कोल्हापूरात अटक; राजस्थान पोलिसांनी केली कारवाई

कोल्हापूरएका महिन्यापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
  • जेल फोडून पसार झालेल्या पपलावर होते पाच लाखांचे इनाम

राजस्थानसह तीन राज्यात मोस्ट वाॅंटेड असलेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जर याला कोल्हापूरात मोठ्या शिताफीने अटक करण्यात आली. आठ दिवस रेकी करुन राजस्थानच्या कमांडो पथकाने अत्यंत धाडसाने पपलाला जेरबंद केले. अत्यंत गोपनीयरित्या पोलिसांनी हे मिशन फत्ते केले. राजस्थानमधील जेल फोडून पसार झालेल्या कुख्यात गुंड पपला गुर्जरवर पाच लाख इनाम जाहीर करण्यात आला होता. राजस्थान पोलिसांनी कोल्हापूरातील सरनोबतवाडी नजीक अटकेची कारवाई केली.

राजस्थानमधील कख्यात गुंड गुर्जर हा हरियाणा येथून २०१६ पासून फरार होता. त्याच्यावर राजस्थानमधील विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे. काही गुन्ह्यात त्याला न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. शिक्षा भोगत असतानाच तो अल्वर राजस्थान येथील जेलमधून सप्टेंबर २०१९ जेलची सुरक्षा भेदून पळाला होता. २०१६ पासून राजस्थान पोलीस त्याच्या मागावर होती.

संबंधित कुख्यात गुंडाने कोल्हापूरात आश्रय घेतल्याची माहिती राजस्थान पोलिसांना मिळाली. तो गुंड कोल्हापूरात सरनोबतवाडी नजीक रहात होता अशी माहिती समोर आली होती. राजस्थानमधील पोलीसांचे एक पथक कोल्हापूरात दाखल झाले. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष-२६ सदस्यांच्या पथकाने सुमारे आठवडाभर कोल्हापुरात तळ ठोकला. या पथकाने स्थलांतरित राजस्थान वासीयांकडून माहितीदेखील गोळा केली. राजस्थान पोलिसांच्या एएसपी सिद्धांत शर्मा यांच्या नेतृत्वात काम करणार्‍या या विशेष पथकाने २६ जानेवारीला घराचे व्हिडिओ व जवळील छायाचित्रे गोळा केली. वरिष्ठांना संपूर्ण माहिती पाठवून सुरक्षित कारवाईचे धोरण आखले. रणनीतीचा एक भाग म्हणून, ईआरटी कमांडो पथकाने २७ जानेवारीला मध्यरात्री इमारतीला घेराव घातला. या दरम्यान पोलिसांनी विक्रम उर्फ ​​पपला गुर्जर याला अटक केली. घटनास्थळावरून पळण्याच्या प्रयत्नात पपला गुर्जर यांनी इमारतीच्या खाली उडी मारली. ज्यामुळे त्याच्या हात व पायातही जखम झाल्या आहेत. सावध आणि सतर्क कमांडोंनी त्याला घटनास्थळावर महिला साथीदार झिया उशर हीच्यासह पकडले. यापूर्वी राजस्थान पोलिसांच्या पथकाने मथुरा, कानपूर आणि गाझियाबाद येथेही छापा टाकला होता.

महेंद्रगड हरियाणा पोलिसांना हरियाणा-राजस्थानचा मोस्ट वॉन्टेड विक्रम उर्फ ​​पपला गुर्जरला सुमारे साडेतीन वर्षांत एकदा अटक केली जाऊ शकली नाही. राजस्थान पोलिसांनी दीड वर्षात दुसऱ्यांदा पपलाला अटक केली.

राजस्थान पोलिसांनी मध्यरात्री पोलिस फौजफाटा तैनात करुन त्या गुंडाला ताब्यात घेतले. त्याला राजस्थानला नेण्यात आले आहे. दरम्यान, कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी राजस्थानमधील एका कुख्यात गुंडावर कारवाई केली असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र अधिक माहिती दिली नाही.

बातम्या आणखी आहेत...