आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंडे पॉझिटिव्ह:कोरोना वॉर्डामध्ये विठुनामात रुग्ण मग्न, कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील सुखद चित्र

कोल्हापूर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुखसोहळा स्वर्गी नाही....
Advertisement
Advertisement

विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुखसोहळा स्वर्गी नाही....

अगदी याच ओळींची प्रचिती कोल्हापूरच्या (सीपीआर) छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांकडून भजन-कीर्तनातून सत्संग सुरू असतो. यामुळे रुग्णांचे मनोबल वाढले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये वाढच होत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, दुसरीकडे एक दिलासा देणारी गोष्ट सुरू आहे, ती म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे.

सत्संग , भजन, कीर्तन हा आध्यात्मिक मार्ग मनोबल वाढवतो. यामुळे रुग्णांची मनातील भीती जाऊन तो चिंतामुक्त होतो. याचा अनुभव सध्या कोरोना वॉर्डमधील रुग्णांना येऊ लागला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी उपचार घेणाऱ्या अनेक वृद्ध रुग्णांना यांचा अधिक लाभ होऊ लागला आहे. गांधीनगर येथील एक व्यापारी वॉर्डमध्ये दाखल झाले. या ठिकाणी दाखल अनेक लोक शांत बसून होते. काही जण मोबाइलवर बोलून पुन्हा शांत बसून राहायचे. हे पाहून त्यांनी रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी भजन-कीर्तनामध्ये त्यांना व्यग्र ठेवले आहे. आता रोज सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास या ठिकाणी भजन-कीर्तन सुरू राहते. सर्वजण आपापल्या खाटांशेजारी उभे राहून मंदिरात ज्या पद्धतीने भजन करतात अगदी त्याच पद्धतीने रुग्णालयात टाळ्या वाजवत भजन करत आहेत. शिवाय त्यांच्या चेहऱ्यावरचा तणावसुद्धा त्यामुळे दूर झाला आहे.

आम्ही एकदम टकाटक

कोरोना कक्षातील रुग्णांशी संवाद साधला असता त्यांनी कुठला कोरोना? आम्ही एकदम टकाटक आहोत, असे सांगितले. उलट डॉक्टर आम्हाला म्हणाले की, इथे येणारे सगळे रडत असतात, तुम्ही मात्र गेल्या सहा दिवसांत येथील वातावरण बदलून टाकले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement
0