आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:राज्यभरात घोटाळा करण्याची कला पवार, उद्धव ठाकरेंनी विकसित केली : किरीट सोमय्यांचा आरोप

कोल्हापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

ठाकरे सरकारच्या राज्यात घोटाळा करण्याची एक कला उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी विकसित केली आहे. वेगवेगळ्या पद्धतीने घोटाळे करायचेच असे त्यांनी ठरवले आहे, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या कोल्हापुरात बुधवारी केला. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या किरीट सोमय्या यांनी कोल्हापूरच्या मुरगुड पोलिस स्टेशनमध्ये हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रारही नोंदवली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. या वेळी हसन मुश्रीफ यांनी तिसरा १५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात मी तक्रार दिली आहे. मुश्रीफ यांनी जी कंपनी दाखवली ती अस्तित्वात नाही. अज्ञात कंपनीच्या नावाने बँक अकाउंटद्वारे पैसे आपल्या कुटुंबाच्या खात्यामध्ये घेतले आहेत. म्हणून मी पोलिस अधिकाऱ्यांना पुरावे दिले,” असे किरीट सोमय्या म्हणाले.

हसन मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने १५०० कोटींचा घोटाळा केला आहे. ही कला पण वेगळीच कला आहे. मुश्रीफांनी स्वतःच्या ग्रामविकास खात्याच्या कामाचे टेंडर स्वतःच्या जावयाच्या कंपनीलाच दिले. ज्या कंपन्या अस्तित्वात नाहीत त्या कंपन्यांमधून पैसे आले. ग्रामविकास खात्याने सगळ्या ग्रामपंचायतींसाठी निविदा काढल्या, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, सोमय्या यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले.

सोमय्या, पाटील यांनी शंभर कोटींच्या दाव्याची नोटीस स्वीकारली नाही : न्यायालयाच्या परवानगीने मुश्रीफ यांच्या वकिलामार्फत बेलिफ शंभर कोटींच्या दाव्याचे समन्स बजावण्यासाठी गेले असता किरीट सोमय्या यांनी ते नाकारले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तर मी झोपलो आहे. उद्या या असे कारण देत दोनदा बेलिफ यांना माघारी पाठवल्याचे ते म्हणाले.

सोमय्यांवर मुश्रीफांकडून १०० कोटींचा दावा
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयात मंत्री मुश्रीफ यांच्या वतीने ज्येष्ठ वकील व कायदेतज्ज्ञ ॲड. प्रशांत चिटणीस व त्यांचे सहकारी ॲड सतीश कुणकेकर यांनी हा दावा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...