आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:लॉकडाउनमध्ये रात्री भररस्त्यात गाणी लावून नाचणाऱ्यांना पोलिसांनी दिला लाठी प्रसाद, लॉकडाउन सुरू झाल्याच्या काही क्षणात कारवाई

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाउन सुरू झाल्यानंतर काही क्षणात पोलिसांनी केली कारवाई

कोल्हापूरात आजपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पोलिस रस्त्यावर गस्त घालत आहेत. शहरात लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही क्षणातच पोलिसांनी रस्त्यावर धिंगाणा घालणाऱ्या तरुणांविरोधात कारवाई केली. काही तरुण रंकाळा टॉवर परिसरात रात्री उशिरापर्यंत गाणी लावून नाचत होते. पोलिसांनी या नाचणाऱ्या तरुणांचा चांगलाच समाचार घेतला. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर काही क्षणातच ही कारवाई झाली. गाणी लावून भररस्त्यात नाचणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच लाठी प्रसाद दिला.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कोल्हापूरात सात दिवसांचा लॉकडाऊन लावला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्याच्या काही क्षणातच रंकाळा टॉवर परिसरात चार चाकी गाडी भररस्त्यात लावून काही तरुण गाणी लावून धिंगाणा घालत होते. समोरून पोलिसांची गाडी येताच यातील दोघा-तिघांनी पळ काढला. पण एक जण मात्र पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याचा चांगलाच समाचार घेतला.

कोल्हापूर आजपासून 7 दिवसांसाठी बंद 

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडकडीत लॉकडाऊन सुरू झाला. पुढील सात दिवसांपर्यंत हा लॉकडाउन राहणाह आहे. तर 2 आठवड्यांसाठी जिल्हाबंदी राहणार आहे. लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी कोल्हापूरातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पोलिस प्रशासन ही सर्वत्र कार्यरत आहे. प्रशासकीय सेवा व अत्यावश्यक सेवा वगळता एक ही नागरिक घराबाहेर दिसत नाहीये. या 7 दिवसांत औषध आणि दूध पुरवठा यांनाच सवलत दिली जाईल. इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.

लॉकडाउनच्या अंमलबाजवणीसाठी पोलिस प्रशासन सज्ज

कोल्हापूर शहरात चौकाचौकात पोलिस तैनात आहेत. पोलिस प्रशासन प्रत्येक वाहनधारकाची कसून चौकशी केल्याशिवाय पुढे सोडले जात नाही. प्रशासनाने प्रत्येक चौक सील केला असून नागरिकांना बाहेर न पडण्याची कळकळीची विनंती केली जात आहे.