आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोल्हापूर:अल्पवयीन वधूच्या गळ्यात हार घालण्याआधीच हातकड्या, मुलीच्या आईसह दोन्ही कुटुंबातील सदस्यांवर गुन्हा दाखल

सांगली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निनावी फोन आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी हा बालविवाह रोखला

कोल्हापुरात अल्वपयीन मुलीबरोबर विवाहेइच्छुक असलेल्या राहुल गोसावी (२४) याला वधूच्या गळ्यात हार घालण्याआधीच कोल्हापूर पोलिसांनी हातकड्या घातल्या. गोसावी कुटुंबाबरोबरच मुलीच्या आईसह या दोन्ही कुटुंबातील काही जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवरदेव राहुल राजुनाथ गोसावी त्याचे वडील आणि आई मनीषा (रा. इस्लामपूर, जिल्हा सांगली) याबरोबरच मुलीची आई आशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल याचे एका अल्पवयीन मुलीबरोबर गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. घरच्यांचा विरोध असतानाही लग्न न लावून दिल्यास पळून जाऊन लग्न करण्याची धमकी या दोघांनी दिली होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबीयांनी अखेर त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता.

या दोघांचा विवाह सुरू असातानाच ‘चाइल्डलाइन’ या संस्थेला निनावी फोन आला होता. त्यानुसार संस्थेच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी हा बालविवाह रोखला. बालसंरक्षण समितीच्या आदेशानुसार १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल गुजर चाइल्डलाइन संस्थेच्या सुरैया शिकलगार आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या प्रणाली दुधगावकर यांनी बालविवाह रोखण्याची कारवाई केली.