आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेळगाव:कन्नड कार्यकर्त्यांचा आज पुन्हा बेळगावात धुडगूस, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

बेळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीबाबत पोटशूळ उटलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या बंगळूरमधील एका गटाने पुन्हा बेळगावात येऊन शिवसेनेच्या विरोधात निदर्शने केली. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदीकेचा लाल पिवळा ध्वज लावण्यासाठी परवानगी द्या म्हणून चन्नम्मा चौकात आज कन्नड कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. पण निदर्शने करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. याठिकाणी आंदोलनकर्त्यापेक्षा पोलिसाचीच संख्या अधिक होती. सीमेवर ध्वज लावण्यासाठी चन्नम्मा चौकात त्यांचे आदोलनाचा प्रकार हास्यास्पद होता.

बेळगावात मराठी फलक बदलण्यात यावेत, महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवरील कोगनोळी येथे लाल पिवळा ध्वज लावण्यात यावायामागणीसाठी त्यांनी आंदोलन केले. निदर्शने करणाऱ्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी पकडून अज्ञात स्थळी नेले.

गेल्या आठवड्यात शिवसेनेच्य जिल्हाप्रमुखांच्या वाहनावर हल्ल करण्यात आला होता. त्यामुळे सीमाभागात आणि महाराष्ट्रात संतप्त पडसाद उमटले. सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमांत याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्यामुळे कन्नडीगांच्या संघटनांना पोटशूळ उठला होता. आज बंगळूरमधील प्रवीण शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील एका संघटनेने निदर्शने केली. आंदोलनामध्ये ५० कार्यकर्ते आणि बंदोबस्त शंभरभर पोलिसांचा लावण्यात आला होता.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामलिंगखिंड गल्लीसमोर बॅरीकेट टाकून पोलिसांनी रस्ता अडवला होता. महराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यालय आणि शिवसेना कार्यालयासमोरही पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...